Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता नक्षलवादीही छापू लागले नकली नोटा…-नक्षल्यांनी शस्त्रांसह नोटा छापण्याचे साहित्य जागेवरच सोडून...

आता नक्षलवादीही छापू लागले नकली नोटा…-नक्षल्यांनी शस्त्रांसह नोटा छापण्याचे साहित्य जागेवरच सोडून काढला पळ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आता नकली नोटाही छापू लागले असल्याचे उघडकीला आले आहे.सुकमा पोलिसांनी नक्षल्यांच्या एका ठिकाणावर टाकलेल्या छाप्यातून ही खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.चार हजार ३०० रुपयांच्या नकली नोटा,शाई,प्रिंटर आदी नोटा छापण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.नक्षलवादी संघटनेने आपल्या कॅडर्सना नोटा छापण्याचे रीतसर प्रशिक्षणही दिल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मैलासूर,कोराजगुडा, दंतेशपुरमलगतच्या जंगलांतून नक्षल्यांच्या हजेरीची खबर पोलिसांना मिळाली होती.पोलीस,डीआरजी, बस्तर फायटर्स आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे मागोवा घेतला.जवान कोराजगुड्याच्या दिशेने निघाले आहेत आणि जवळ पोहोचले आहेत; अशी खबर मिळताच नक्षल्यांनी शस्त्रांसह नोटा छापण्याचे साहित्य जागेवरच सोडून पळ काढला.

बंदुका,कलर प्रिंटर मशिन,ब्लॅक प्रिंटर मशिन, इन्व्हर्टर, प्रिंटर मशीन कॉटिज,ईमेज किंग,११८ जीपीएस पावडर,२३ बाटल्या प्रिंटर इंक ५०,१००, २०० आणि ५०० रुपयांच्या नकली नोटा इत्यादी साहित्य जप्त करण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!