उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- तेलंगणामधील काँग्रेस सरकारने ४० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रातही शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे. तेलंगणा सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफी केली आहे.
राज्यात शेतकरी संपानंतर आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र, अटी शर्तीमुळं अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असल्याचे अजित नवले म्हणाले तेलंगणामधील काँग्रेस सरकारने ४० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री रेवंथा रेड्डी यांनी ३१ हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली आहे.शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याची घोषणा काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती.

