Thursday, October 15, 2026
Homeनागपूरनागपूर आणि चंद्रपूर येथे पहिल्यांदाच सुरू होणार वन औद्योगिक विकास महामंडळ - सुधीर...

नागपूर आणि चंद्रपूर येथे पहिल्यांदाच सुरू होणार वन औद्योगिक विकास महामंडळ – सुधीर मुनगंटीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- राज्यात पहिल्यांदाच नागपूर आणि चंद्रपूर येथे वन औद्योगिक विकास महामंडळ(एफआयडीसी) सुरू करण्यात येईल,अशी माहिती राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.९ मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात या संबंधात घोषणा केली जाणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

राज्यात वन आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.टुथ पिक,अगरबत्तीसाठी लागणारी काडी याशिवाय फर्निचरसाठी लागणारे लाकूडही आपण आयात करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला आहे. त्या दिशेने एक पाऊल म्हणून एफआयडीसी सुरू करणार आहोत.आर्थिक आणि औद्योगिक विकासात भर घालणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धर्तीवर हे महामंडळ सुरू करण्यात येणार आहे.

उपजीविकेसाठी कृषी,वन आणि जल विभाग हे महत्वाचे आहे.मासेमारी आणि वनविभागावर उपजीविका चालते.नागपूर हे देशाच्या मध्यभागी आहे.वनविकास महामंडळ आणि वनविभाग मिळून दरवर्षी ६०० ते ७०० कोटी रुपयांची सागवान लाकडाची विक्री होते.त्याऐवजी तयार फर्निचर विकले जाईल.नागपूर येथे फर्निचरचे तर चंद्रपूर येथे वनौषधींचे सुविधा केंद्र (काॅमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यात येणार आहे.या केंद्रांमध्ये नाममात्र दरात उद्योजकांना सुविधा देण्यात येईल व यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रे खरेदी करण्यात येणार आहे.पर्यावरणावर आधारित औद्योगिक क्षेत्राकडे वळण्याची आज गरज आहे.वनौषधी आणि वनाधारित छोटे उद्योगाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.वनाधारित समूह चंद्रपूर येथे असेल. चंद्रपूर आणि गडचिराेली जिल्ह्यात वनौषधीचा खजीना आहे.यासाठी आम्ही वैद्यनाथ,पतंजली,सांडू, डाबर यांच्याशी भागीदारी करणार आहोत.त्याचे प्रशिक्षण आदीवासी शेतकऱ्यांना देण्यात येईल ज्यातून त्यांनाही रोजगार मिळेल असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!