Saturday, October 3, 2026
Homeनागपूरनागपूरमध्ये वकील बाप आणि मुलाने दारूच्या नशेत जेष्ठ नागरिकाची केली हत्या…

नागपूरमध्ये वकील बाप आणि मुलाने दारूच्या नशेत जेष्ठ नागरिकाची केली हत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- नागपूरमध्ये वकील बाप आणि मुलाने दारूच्या नशेत जेष्ठ नागरिकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.दारू पिताना झालेल्या वादात ६० वर्षीय वयोवृद्धाची हत्या करण्यात आली. जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नागपूरात मोठी खळबळ उडाली आहे.सदर प्रकरणी आरोपी बाप आणि मुलाला अटक करण्यात आली आहे.

पेशाने वकील असलेले अश्विन वासनिक मृतक हरीश कराडे यांचे कामगार न्यायालयात प्रकरण सांभाळत होते.दोघेही एकाच भागात राहत असल्यामुळे त्यांची मैत्री होती.एकमेकांकडे येणे-जाणे सुरू होते.घटनेच्या दिवशीही काल,सोमवारी पहाटे २७ मे रोजी हरीश कराडे अश्विनच्या घरी रात्री दारू प्यायला बसलेले होते.दरम्यान दारू पीत असताना हरीश आणि अश्विन या दोघांमध्ये वाद झाला.अश्विन वासनिकचा मुलगा अविष्कार हा सुद्धा तेथे आला.वकील बाप लेकाने मिळून हरीशला कुऱ्हाडीच्या लोखंडी दांड्याने जोरदार मारहाण केली.यात हरीश कराडेचा मृत्यू झाला.हरीश दिवाकर कराडे,असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. ते वायूसेनेतून निवृत्त झाल्यानंतर एका कंपनीत काम करीत होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!