उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-वर्धा,वाशिम,अमरावती,नागपूर,भंडारा,गोंदिया, गडचिरोली,चंद्रपूर,अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील अविवाहीत तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळावा ५ ते ११ जुलैदरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्चपर्यंत आहे.तसेच सदर भरतीकरिता विविध प्रवर्गासाठी भरतीपूर्व ऑनलाइन कॉम्प्युटर आधारित परीक्षा १७ एप्रिलपासून सुरू होतील.भरतीमध्ये अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक्निकल,अग्निवीर क्लर्क,एसकेटी, अग्निवीर ट्रेडस्मेन या पदांचा समावेश आहे.पात्र युवकांनीwww.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी; असे आवाहन करण्यात आले आहे.