उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ‘ॲडिनो व्हायरस’ने कहर केला आहे.मागील २४ तासांत पाच मुलांचा मृत्यूची नोंद आहे.नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण असले तरी त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत.मागील दोन वर्षे बंद असलेली शाळा,कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती यामुळे हा ‘व्हायरस’ वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
पश्चिम बंगालमधील काही मुलांची चाचणी केली असता श्वसनाचा संसर्ग असलेल्या जवळपास ३२ टक्के नमुन्यांमध्ये ‘ॲडिनो व्हायरस’ आढळून आला. ताप,खोकला,नाक वाहणे किंवा श्वसनाचा त्रासानंतर पुढे न्यूमोनियाच्या संसर्गामुळे मुलांचा मृत्यू झाले आहेत.यामुळे येथील काही शाळांमध्ये ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’ व ‘सोशल’ डिस्टन्सिंग’चे नियम लागू केले आहेत.लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचे आवाहनही केले जात आहे. नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण आढळून येत आहेत; परंतु, त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत. यामुळे घाबरण्याचे कारण नाही.मात्र,लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले जात आहे.
लक्षणे 👇
हा व्हायरस सहसा शाळेतील विद्याथ्र्यांकडून घरातील व्यक्तींना होतो.
चार दिवसांपेक्षा जास्त ताप, सर्दी, खोकला, वीकनेस, डोळे लाल होणे, अस्थमा आदी लक्षणे दिसून येतात.
काही रुग्णांमध्ये डायरियासुद्धा दिसून येतो.हा आजार गंभीर नाही नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.