Tuesday, June 16, 2026
Homeनागपूरनागपुरात भिक मागणारे व तृतीयपंथीयांद्वारे पैसे मागणाऱ्यांवर आजपासून बंदी

नागपुरात भिक मागणारे व तृतीयपंथीयांद्वारे पैसे मागणाऱ्यांवर आजपासून बंदी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- नागपुरात अनेक चौकांमध्ये वाहनचालकांकडून भीक मागण्याचे प्रकार वाढल्याच्या अनेक तक्रारी आहेत.त्यामुळे पोलिसांनी शहरात कलम १४४ अन्वये रस्त्यांवर,चौकात,ट्रॅफिक सिग्नल्सवर थांबून भिकाऱ्यांच्या भीक मागण्यावर तसेच तृतीयपंथीयांद्वारे वाहनचालकांकडून पैसे मागण्यावर बंदी घातली आहे.या आदेशाची आजपासून ९ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत अंमलबजावणी होणार आहे.या बंदी आदेशांचे उल्लंघन केल्यास आयपीसी कलम १८८ अन्वये संबंधित व्यक्तीच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल; असा इशारा नागपूर पोलिसांनी दिला आहे.नागपुरात २१ मार्चपासून जी-२० च्या बैठकांचे आयोजन होत असून परदेशी पाहुण्यांपुढे वास्तव दर्शक चित्र जाऊ नये, यासाठी पोलिसांमार्फत हे परिपत्रक काढण्यात आल्याची चर्चा जोरात आहे.

राज्याची उपराजधानी नागपुरात रस्त्यांवर चौकांवर ट्रॅफिक सिग्नल्सवर भिकारी तसेच तृतीयपंथीयांद्वारे वाहन चालकाकडून पैसे मागण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात वाढले होते.विशेषतः पंचशील चौक,शंकर नगर चौक,व्हेरायटी चौक,रेशीमबाग चौक तसेच छत्रपती चौकात तृतीयपंथीयांकडून दमदाटीचे प्रकार मोठ्या संख्येने घडत आहेत.याविषयी तक्रारी देखील झाल्या.पंचशील चौकात उड्डाणपुलाच्या आडोश्याने तसेच यशवंत स्टेडिअमपुढे मुक्काम ठोकणाऱ्या भिकाऱ्यांवर अनेकदा कारवाई झाली.मात्र,काही दिवसानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ दिसत असल्याचा अनुभव नागपूरकरांना नेहमीच येतो.आता पोलिसांनी या प्रकारांवर ३० एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. २१ मार्चपासून शहरात जी-२० च्या उपसमितीची बैठक होत आहे.त्यासाठी २१,२२ आणि २३ मार्च रोजी सुमारे २०० परदेशी पाहुणे नागपुरात आहेत. नागपूरबद्धल चुकीचे चित्र उभे राहू नये; या दृष्टिने हे बंदी आदेश लागू केल्याची चर्चा आहे.दुसरीकडे रस्त्यांवर भिकाऱ्यांकडून तसेच तृतीयपंथीयांकडून वाहनचालकांना होणारा त्रास कमी व्हावा; यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची देखील मागणी होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

विदर्भातील जिल्हे वगळता आजपासून शाळेला सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील ११ जिल्हे वगळता आज,सोमवार १५ जूनपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!