Wednesday, May 27, 2026
Homeनागपूरनशीब बलवत्तर..! काँग्रेस खासदारांच्या वाहनाचा दुसऱ्यांदा अपघात; कारचे मोठे नुकसान..

नशीब बलवत्तर..! काँग्रेस खासदारांच्या वाहनाचा दुसऱ्यांदा अपघात; कारचे मोठे नुकसान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या कारचा आज,सोमवार ३० मार्च रोजी सकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील हल्दीरामसमोर ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.कारच्या पुढील भागात ट्रकची जोरदार धडक बसल्याने कारचे मोठे नुकसान झाले असून नशीब बलवत्तर म्हणून खासदार डॉ.प्रशांत पडोळे हे थोडक्यात बचावले.मात्र,अपघातात ते किरकोळ जखमी झाले. विशेष म्हणजे,खासदारांच्या वाहनाचा हा दुसरा अपघात आहे.
खासदार प्रशांत पडोळे हे आज भंडारावरून सुरक्षारक्षक आणि चालकासह पहाटे दिल्लीला जाण्यासाठी नागपूर एअरपोर्टकडे निघाले होते.दरम्यान,नागपूर जिल्ह्यातील हल्दीरामसमोर ट्रकने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की,कारचा समोरील भाग चक्काचूर झाला.अपघातात खासदार प्रशांत पडोळे किरकोळ जखमी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या वाहनाने नागपूर गाठले आणि तिथे प्राथमिक उपचारानंतर नागपूर विमानतळावर पोहोचून दिल्लीला रवाना झाले.
  • यापूर्वीही झाला होता अपघात👇
परतीच्या प्रवासावर असतांना काँग्रेसचे भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या फॉर्च्यूनर कारचा गुरुवार,११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास नागपूरच्या उमरेड बायपास मार्गावर भीषण अपघात झाला होता. अपघातात पडोळे यांच्यासह अन्य तिघेजण थोडक्यात बचावले.मात्र,पडोळे यांच्या वाहनाच्या समोरील भाग चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले होते.उपराष्ट्रपती पदाची निवडणूक दिल्ली येथे पार पडली होती. त्यासाठी खासदार पडोळे दिल्लीला गेले होते.दिल्लीहून नागपूरला ते विमानाने आले असता पडोळे यांना घेण्यासाठी एमएच ३६ एपी ९९११ क्रमांकाच्या कारने त्यांचे पीए यश पाटील,वाहन चालक राहुल गिऱ्हपुंजे व पडोळे यांचे मित्र गिरीश रहांगडाले असे तिघे नागपूरला गेले होते.पडोळे यांना घेऊन ते नागपूर-भंडारा या राष्ट्रीय महामार्गावरून भंडाऱ्याकडे निघाले असतांनाच नागपूरच्या उमरेड बायपास मार्गावर एका ट्रकने त्यांच्या कारला जोराची धडक दिली होती.यात चौघेही किरकोळ जखमी झाले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!