Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षल्यांकडून निष्पाप लोकांची हत्या; तिघांना लटकवले फासावर..

नक्षल्यांकडून निष्पाप लोकांची हत्या; तिघांना लटकवले फासावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नक्षलवादी संघटनेच्या अनेक मोठ्या नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. त्यातच काहीजण नक्षली संघटनेला रामराम ठोकून आत्मसमर्पण करू लागलेत.त्यामुळे नक्षलवादी बिथरून निष्पाप लोकांची हत्या करू लागल्याची घटना काल,मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील पेड्डाकोर्मा गावात घडली.बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी पहिल्यांदा तिघांचे अपहरण केले व नंतर जंगलात नेऊन तिघांनाही फासावर लटकवले.झिंगू मोडियम,सोमा मोडियम या दोन नागरिकांसह अनिल माडवी या विद्यार्थ्याचा यात समावेश आहे.झिंगू व सोमा हे आत्मसमर्पित नक्षलवादी होते.याशिवाय नक्षलवाद्यांनी सात गावकऱ्यांनाही बेदम मारहाण करून जखमी केले आहे.मारण्यात आलेले तिघेही आत्मसमर्पण करणाऱ्या दिनेश मोडियमचे जवळचे नातेवाईक होते.नक्षलवादी नेता वेल्ला आणि त्याच्या टीमने ही घटना घडवून आणल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिसात तक्रार नोंदवण्यात आलेली नव्हती.घटनेने गंगापूर परिसरातील पेड्डाकोर्मा सह बिजापूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!