Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांनी हजारो निष्पाप आदिवासी आणि दलितांच्या हत्येबद्दल जाहीरपणे माफी मागावी.. - जनसंघर्ष...

नक्षलवाद्यांनी हजारो निष्पाप आदिवासी आणि दलितांच्या हत्येबद्दल जाहीरपणे माफी मागावी.. – जनसंघर्ष समिती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नक्षलवाद्यांनी आतापर्यंत हजारो निष्पाप आदिवासी व नागरिकांना क्रूरपणे मारले आहे.त्यांनी सरकारसमोर शांतता चर्चेची विनंती केली आहे,ही चांगली बाब आहे.मात्र,त्याअगोदर काही अटींचे त्यांना पालन करायला लावणे अनिवार्य आहे.येत्या १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, सीपीआय (माओवादी) पक्षाच्या भूमिगत नेत्यांनी उघडपणे समोर येऊन हजारो निष्पाप आदिवासी आणि दलितांच्या हत्येबद्दल जाहीरपणे माफी मागावी.तसेच भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी जाहीर करावे. माओवादी चळवळीतील नेते मुख्य प्रवाहातील संवैधानिक प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक आहे, हे त्यांनी जनतेला सांगावे.त्यांनी सीपीआय (माओवादी)पक्ष विसर्जित करावा व सर्व शस्त्रे तसेच दारूगोळा पोलिसांच्या हवाली करावा.माओवादी पक्षाच्या सरचिटणीसांपासून ते पीएलजीएच्या शेवटच्या नक्षलवाद्यापर्यंत सर्वांनीच सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण करावे,अशी अट टाकण्यात यावी.तसेच माओवाद्यांनी त्यांच्या शहरी आघाडीच्या संघटना आणि कार्यकर्त्यांची नावे उघडपणे जाहीर करावीत.त्यांच्याशी निगडित शहरी संघटना बरखास्त कराव्या ही महत्त्वाची अट त्यांच्यासमोर टाकायला हवी,अशी पत्रातून नागपूर जनसंघर्ष समितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!