उद्रेक न्युज वृत्त
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात व छत्तीसगड राज्यातील काही जिल्ह्यात व सिमांकित भागात मोठ्या प्रमाणावर नक्षली कारवाया होतांना दिसून येतात.नक्षलग्रस्त भागात जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांकरिता नक्षलवाध्यांकडून कां बरं विरोध केल्या जाते.हे अजूनपर्यंत कळलेले नाही.एकीकडे आम्ही लोकांसाठी काम करतो असे त्यांच्या कडून भासविले जाते.मात्र निष्पाप व जन सुविधेसाठी पुढाकार घेणाऱ्यांना दडपल्या जात आहे.नक्षल्यांच्या या कृतींमुळे नेमका उद्देश काय? हे अजूनपर्यंत कळलेले नाही.केवळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणे हा उद्देश आहे की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.