Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसंप मागे; उद्यापासून कर्मचारी रुजू मात्र जुनी पेन्शन,नवी पेन्शन योजना वाद

संप मागे; उद्यापासून कर्मचारी रुजू मात्र जुनी पेन्शन,नवी पेन्शन योजना वाद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न कुठेही इगो न ठेवता आम्ही सोडवला आहे.त्यांना हवी असलेली सामाजिक सुरक्षितता, त्यांना हवे असलेले सेवानिवृत्तीनंतरचे लाभ, त्या संदर्भातले तत्व आम्ही मान्य केले आहेत. आता त्यांची अंमलबजावणी कशी करायची या संदर्भात ही समिती काम करणार आहे.अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.

आम्ही पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की समितीच्या अहवालातून कुणालाही वगळणार नाही.सर्वांना सोबत घेऊनच आपल्याला चालायचे आहे.त्यामुळे निश्चितच समितीने घेतलेला निर्णय सर्वांना लागू होईल.म्हणजेच पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल असे त्यांनी सांगितले.

दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कर्मचाऱ्यांशी चर्चा झाली.संप मागे घेतला आहे.ही आनंदाची बातमी आहे.संपूर्ण चर्चेत कुठेही सरकारने आडमुठी भूमिका न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही कर्मचाऱ्यांचे आभार मानतो.सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो सर्व कर्मचारी आमचे आहे.त्यामुळे त्यांना जे काही चांगल्यात चांगले देता येईल,ते त्यांना देण्याची आमची जबाबदारी आहे.त्या संदर्भात आमची कुठेही आडमुठी भूमिका नाही असे फडणवीस म्हणाले.

सरकारने तयार केलेली समिती ठरवण्यात आलेल्या तीन-चार मुद्द्यांवर आपला अहवाल देईल आणि त्या आधारावर पुढची कारवाई सरकार करील.संवादाने तोडगा निघतो असे आम्ही म्हणत होतो आणि आता संवाद झालेला आहे.मुख्यमंत्री आणि कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो.आमचा प्रयत्न होता की संप होऊच नये.मात्र,तरीही संप झाला.मात्र,आज तो मागे घेतला जात आहे, ही आनंदाची बाब आहे.पुढेही आम्ही सोबत जास्तीत जास्त चर्चा करून मार्ग काढू.

समितीला तीन महिन्याचा वेळ दिलेला आहे.ही समिती जुनी पेन्शन योजना आणि नवी पेन्शन योजना संदर्भात अभ्यास करील आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले लाभ कसे देता येईल, यासंदर्भातला अहवाल देईल.कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना या समिती सोबत चर्चा करतील असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!