- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील
बिजापूरच्या कुत्रू रोडवर जवानांच्या वाहनास आयईडीच्या स्फोटने उडवले असल्याची घटना आज,सोमवार ६ जानेवारीला दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी घडली.भारतीय लष्कराच्या ८ जवानांसह एक चालक शहीद झाला आहे.तर ६ हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत.दंतेवाडामध्ये संयुक्त मोहिम राबवून हे जवान छावणीत परत जात होते.
घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.अनेक डीआरजी कर्मचारी पिकअपमध्ये होते.असे सांगितले जात आहे. आयईडी हा सुमारे तीन किलो वजनाचा स्फोटक होता.हा स्फोट एवढा भीषण होता की,जवानांच्या वाहनाचे तुकडे झाले.दंतेवाडा,नारायणपूर आणि बिजापूरचे संयुक्त ऑपरेशन पूर्ण करून परत जात असतांना बिजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी हा घातपात केला.नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ आयईडीचा स्फोट केला.काल रविवारी पखंजूरमध्ये सुरक्षा दलाने पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.
- Advertisement -