Thursday, July 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवादी चळवळीला मोठा हादरा; कुख्यात नक्षलवाद्यांची शरणागती..

नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा; कुख्यात नक्षलवाद्यांची शरणागती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या चार दशकांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आणि नक्षली संघटनेची सर्व सूत्रे हाताळणाऱ्या कुख्यात नक्षलवाद्याने पोलिसांपुढे स्वतःहून शरणागती पत्करल्याने नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.नक्षलवादी संघटनेचा महासचिव थिप्पारी तिरुपती ऊर्फ ‘देवजी’ याने स्वतः व आपला खंदा समर्थक केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी उर्फ संग्राम यांनी आज,रविवार २२ फेब्रुवारीला तेलंगणा राज्याच्या आसिफाबाद पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा(माओवादी)सरचिटणीस नंबला केशवराव उर्फ बसवराज याला २१ मे २०२५ रोजी छत्तीसगडच्या नारायणपूर जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीत ठार केले होते.त्यानंतर,चळवळीचे संपूर्ण सूत्रे जहाल नक्षली नेता थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी वय ६१ वर्षे याच्याकडे सोपविण्यात आली होती.मंगळवार ९ सप्टेंबर २०२५ ला यावर शिक्कामोर्तब झाले होते.
केवळ छत्तीसगडमध्येच त्याच्यावर दीड कोटी रुपयांचे बक्षीस तर संग्रामवर एक कोटींचे बक्षीस आहे.देवजी हा नक्षलवादी संघटनेच्या ‘पॉलिट ब्युरो’चा सदस्य असून तो चळवळीचा मुख्य रणनीतीकार मानला जातो. नक्षलवाद्यांचे आंतरराष्ट्रीय संपर्क,शस्त्रास्त्रांची रसद आणि मोठ्या हल्ल्यांचे नियोजन त्याच्याच इशाऱ्यावर होत असे.तो पोलिसांच्या ताब्यात आल्याने नक्षलवाद्यांच्या आगामी घातपाती कारवायांचा कट उधळून लावण्यात यश आले आहे.पोलिसांना गुंगारा देणारा देवजी हा ढासळत्या प्रकृतीमुळे वा संघटनेतील अंतर्गत कलहामुळे शरणागतीच्या वाटेवर पोहचला असावा,असे बोलल्या जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!