- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली होती.घटनेनंतर विमान कोसळल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसारित करण्यात आल्या होत्या.मात्र,राज्याच्या
उपमुख्यमंत्री तथा बारामतीच्या आमदार सुनेत्रा पवार यांनी विमान कोसळल्याच्या बातम्यांना पूर्ण विराम दिला आहे.विमान प्रत्यक्षात कोसळलेले नसून,त्याने आकाशात उड्डाणही केले नव्हते.विमान केवळ धावपट्टीवर होते आणि वळण घेत असतांना त्याचे एक चाक बाजूला अडकले.या पलीकडे कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नसून,सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.विशेष म्हणजे, ट्रेनर विमानात कॅप्टन चिराग शशिकांत डोइफोडे आणि कॅडेट अभिजीत जुंद्रे हे दोघे होते.दोघेही सुरक्षित असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.महत्वाचे म्हणजे,आज घडलेल्या बारामतीतील घटनेमुळे याचवर्षी २८ जानेवारी रोजी घडलेल्या एका अत्यंत भीषण आणि दुर्दैवी विमान अपघाताच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.या अपघातात राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.हे विशेष.
- Advertisement -

