Friday, September 11, 2026
Homeचंद्रपूरदोन पिल्लांसह अस्वलाचे दर्शन; गावकरी भयभीत..!

दोन पिल्लांसह अस्वलाचे दर्शन; गावकरी भयभीत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील वाढोणा गाव परिसरातील शेतशिवारात ग्रामस्थांना दोन पिल्लांसह अस्वलाचे दर्शन झाल्याने काहीकाळ गावकरी भयभीत झाले होते.प्रकरणी स्वॉब फाऊंडेशनला माहिती मिळताच वन विभागाच्या पथकासह घटनास्थळी दाखल होत मध्यरात्रीपर्यंत गस्त घालून फटाक्यांच्या आतषबाजीत अस्वल व तिच्या दोन पिल्लांना जंगलाच्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न केला गेला.अश्यातच परत तीच अस्वल आज नागभिड तालुक्याच्या सावरगाव परिसरातील शेतशिवारात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.अस्वल आपल्या पिल्लांसाठी कुठल्याही क्षणी हल्ला करू शकते,त्यामुळे नागरिकांनी पाठलाग करणे वा तिला हुस्कवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन स्वॉब फाऊंडेशन तसेच वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.त्यातच पथकाच्या मार्फत मध्यरात्रीपर्यंत गस्त सुरु असून अस्वल गावात येऊ नये, याकरीता तिला जंगलाच्या दिशेने हाकलून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!