- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज शहरातील निवासी शहजादखान मोहम्मदखान पठाण यांना नुकतीच वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील वाणिज्य या विषयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे आचार्य पदवी (Ph.D) बहाल करण्यात आली आहे.
शिवरामजी मोघे महाविद्यालयातील प्रा.डॉ.मारोती बी.राठोड यांच्या मार्गदर्शना खालील ”गडचिरोली जिल्ह्याच्या आर्थिक विकासात सूरजागड लोह प्रकल्पाचे योगदान एक चिकित्सक अध्ययन” (कालावधी २०१०-२०११ ते २०१९-२०२०) या विषयावर संशोधन केंद्र शिवरामजी मोघे कला,विज्ञान व वाणिज्य महावि्यालय पांढरकवडा ता.केळापूर जि.यवतमाळ अंतर्गत त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले.
गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड लोह प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती,विकासात्मक कामे व विविध विषयांवर उत्कृष्ट अध्ययन केल्याने शहजाद खान पठाण यांना विद्यापीठातर्फे आचार्य पदवी बहाल करण्यात आली.
शहजाद खान पठाण यांना आचार्य पदवी (Ph.D) बहाल करण्यात आल्याने सगळीकडून त्यांना अभिनंदनचा वर्षाव केला जातो आहे.शहजाद यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक प्रा.डॉ.राधेश्याम पी. चौधरी,प्रा.डॉ.अरुण एन.दसोडे,प्रा.डॉ.नागसेन शंभरकर,प्रा.अशपाक सय्यद,संशोधन केंद्र शिवरामजी मोघे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि प्राचार्य डॉ. अजय सोळंके,प्राध्यापक वृंद,आईवडील,आप्तस्वकीय तथा मित्रमंडळी यांना दिले आहे.
- Advertisement -

