Monday, August 17, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज विभागातील फिफ्टी-फिफ्टी शासकीय कामे करणारा 'तो' अधिकारी कोण?- कंत्राटदारांची अन् साहेबाची...

देसाईगंज विभागातील फिफ्टी-फिफ्टी शासकीय कामे करणारा ‘तो’ अधिकारी कोण?- कंत्राटदारांची अन् साहेबाची चांदी तर कर्मचाऱ्यांची झालीय वांदी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज (गडचिरोली) :- शहरातील एका विभागातील अधिकाऱ्याला रुजू होऊन जेमतेम बोटावर मोजण्याइतकीच वर्षे झाली असून साहेबाचा पैश्यासाठी अती उतावळेपणा सुरू आहे.शासकीय कामे कंत्राटदारांशी मिळून फिफ्टी-फिफ्टी करून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे सदर अधिकारी करीत असल्याने कंत्राटदारांची अन् साहेबाची चांदी तर आपल्या पदाचा रौप झाडून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची वांदी झाल्याचे चित्र हल्ली देसाईगंज तालुक्यात सुरू असल्याने याबाबत सर्वत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले आहे.अशातच शासकीय कामात फिफ्टी-फिफ्टी करणारा अधिकारी ‘तो’ कोण? अश्या पेचात सुजाण नागरिक पडले असल्याने ‘बंद खोलीत दाखविले जातेय कोलीत’ असे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.

एका विभागातील अधिकारी शासकीय कार्यालयातील लाखो रुपयांचे कोणतेही काम असो; आपल्या जवळील कंत्राटदाराला सांगून व त्यास प्रदान करून  फिफ्टी-फिफ्टी चा फंडा वापरीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.फिफ्टी-फिफ्टीचा फंडा वापरण्या मागे गूढ रहस्य दाबल्या गेले आहेत.म्हणजेच ‘घरातच आहे दमडी तर मग मी कशाला कुणाकडे खाऊ कोंबडी’ अशी भूमिका संबंधित अधिकाऱ्याकडून बजावली जात आहे.अशा भूमिकेमुळे कुणाला ‘ना हाक ना बोंब’ साहेब करील ते पूर्वदिशा असे मानले जात असल्याने अधिकाऱ्याची चांदीच-चांदी होत आहे. 

मिळून-मिसळून कामे तर केली जात आहेत.अशातच फिफ्टी-फिफ्टीचा फंडा वापरला जात असल्याने निकृष्ट दर्जाची कामे करण्याचाही सपाटा चालवला जातो आहे.आपल्याच घरची खेती म्हणून विना वाहतूक परवाना गौण खनिज संपत्तीची लूट करून  देयके काढण्यात येत आहेत.फिफ्टी-फिफ्टीच्या फंड्यामुळे काही कालावधीतच चेकद्वारे रकमेची देवाणघेवाण होत असल्याचे बोलले जात आहे.कारण घरचीच खेती आहे.तांदळाने धुतलेले कुणीही नाही.मात्र घरचीच खेती म्हणून चक्क शासकीय कामात फिफ्टी-फिफ्टीचा फंडा वापरणे कितपत योग्य आहे.असा फंडा वापरणे एक दिवस महागात पडणार असल्याने हल्ली ‘शुभ दिन’ नंतर ‘सावधान दिन’ असे झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!