Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंकेतर्फे अनिकेत महाविद्यालय येथे वृक्षारोपण…

देसाईगंज विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंकेतर्फे अनिकेत महाविद्यालय येथे वृक्षारोपण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक,शाखा देसाईगंज(वडसा) द्वारे अनिकेत महाविद्यालय, देसाईगंज येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करुन शालेय परिसर व मोकळ्या जागी शाखाधिकारी सुशिल धोपेकर आणि अनिकेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल थूल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

विद्यार्थी हा देशाचा प्रमुख आधारस्तंभ आहे.त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण व त्या वृक्षाचे जतन करणे अत्यंत महत्वाचे आहे. ही वृक्षे भावी पिढ्यांसाठी एकप्रकारची गुंतवणूक आहे,ज्यामुळे नैसर्गिक सावली मिळेल,जमिनीची धूप,  प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरण संतुलन राखून हिरवे आच्छादन वाढवेल; असे मत विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक,देसाईगंज शाखेचे शाखाधिकारी सुशिल धोपेकर यांनी व्यक्त केले.तर दिवसेंदिवस पर्यावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे.पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची गरज आहे; असे मत अनिकेत महाविद्यालय वडसाचे प्राचार्य डॉ.अनिल थूल यांनी व्यक्त केले. 

वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंकेचे कर्मचारी आशिष नागदेवते,शुभम शेबे,गजानन देशमुख तसेच अनिकेत महाविद्यालयाचे प्राध्यापक बाळबुद्धे,नागोसे व इतर कर्मचारी आणि विद्यार्थांच्या  उपस्थितीत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कर्यक्रम पार पडला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!