उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर युवकांनी निराश न होता सातत्याने प्रयत्न केले पाहिजे.जीवनात अशक्य असे काहीही नाही.आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करून स्वयंरोजगाराची कास धरावी; असे अमूल्य प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.कौशल्य रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंजच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन संस्थेच्या कार्यशाळेत करण्यात आले होते. सदर मेळाव्याचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून तहसिलदार करिश्मा चौधरी,देसाईगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण रासकर,देसाईगंज नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा शालूताई दंडवते,सुभाष इंजीनीयरिंगचे संचालक मुरलीधर सुंदरकर उपस्थित होते.तसेच विशेष अतिथि म्हणून राजू एम.मुंडे प्रबंधक भारतीय स्टेट बँक वडसा,तालुका कृषि अधिकारी नीलेश गेडाम,प्रा.दिलीप कहुरके,किशोर मेश्राम,संजय कुथे,प्रभाकर गोबाडे,लक्ष्मण रामाणी व इतर मान्यवर उपस्थित होते.
देसाईगंज तालुक्याचे तहसिलदार करिश्मा चौधरी यांनी उपस्थित उमेदवारांशी संवाद साधून स्पर्धा परीक्षा बद्दल अमूल्य मार्गदर्शन केले.वडसा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी गडचिरोली व महाराष्ट्र पोलिस भरती तसेच अग्निवीर योजनेबद्दल विस्तृत माहिती दिली.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे समुपदेशक प्रभाकर साखरे आणि पुनीत मातकर यांनी १० वी व १२ वी नंतर शिक्षणाच्या संधी व व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले.अनुराग बोरकर यांनी स्वयंरोजगार व शिक्षणाकरिता कर्जाच्या विविध योजने विषयी माहिती दिली.जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुल पवार यांनी व्यवसाय उभारून उद्योजक होण्याचे ध्येय बाळगण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाला देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा व कोरची तालुक्यातील सातशे (७००)युवक व युवतीं सहभागी झाले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य सुरेश एस.चौधरी यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे संचालन सतीश मेश्राम व आभार प्रदर्शन विष्णु नागमोती यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता संस्थेचे गट निर्देशक रविकान्त गोतमारे, डी.व्ही.सुर,रविंद्र लोही,माया जाधव,गुणवंत वांढरे,दीपक बोकडे,राकेश भोयर,टी.यू.सोयम,कु.लता लाडे,संदीप पिलारे,हेमंत मरकोल्हे,गजानन ठाकरे,सुरक्षा रक्षक व संस्थेतील इतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात व राष्ट्रागीताने समापन करण्यात आले.