देसाईगंज :- पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश मेश्राम व त्यांच्या चमूने तालुक्यात अवैधरित्या चालणाऱ्या सट्टा-पट्टी धारकांवर कारवाईचा बडगा उगरताच सर्वांचे धाबे दणाणून गेले आहेत.सर्वसामान्य जनतेच्या खिशाला लागणारी कात्री थांबून देसाईगंज शहराबरोबरच ग्रामीण भागातील सट्टा-पट्टी पोलीस विभागाने हद्दपार केली असल्याने पोलीस विभागाची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कधी न घडणारी घटना हल्ली पहावयास मिळत आहे.दररोज सट्टा-पट्टीच्या दुकानांसमोर अफाट दिसणारी गर्दी आज दिसेनासी झाली आहे.शहरातील व ग्रामीण भागातील सटोरी गँगचा नायनाट झाल्याचे दिसून येत आहे.काहीजण हळूच डोके वर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश मेश्राम डोके वर काढू पहाणाऱ्यांवर पोलिसी हिसका दाखवून बंद पुकारले आहे.
देसाईगंज येथे कित्येक वर्षांपासून अवैध सट्टा-पट्टीचा व्यवसाय जोमात व खुलेआम सुरू होता.कित्येकजण लहानांपासून तर थोरांपर्यंत सट्टा-पट्टीच्या आहारी जाऊन सर्वकाही गमावून बसले होते.अनेकांना सट्टा-पट्टीचे व्यसन जडले होते.एकदा व्यसन जडले तर व्यसनातून बाहेर पडणे अशक्य आहे.अशातच देसाईगंज पोलीस प्रशासनाने कंबर कसून सट्टा-पट्टीच्या जडलेल्या व्यसनातून बाहेर काढले असल्याने म्हणतात ना की पोलीस प्रशासनाने मनात आणले तर सर्वकाही शक्य आहे.याचीच खरी प्रचिती हल्ली निदर्शनास येत आहे.