Thursday, August 13, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज पोलिसांची धडक कारवाई; दारु तस्कराच्या आवळल्या मुसक्या.. - सहा लाख रुपयांचा...

देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई; दारु तस्कराच्या आवळल्या मुसक्या.. – सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील दारु विक्रिवर प्रतिबंध लावण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली असुन एका दारु तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप आगरकर यांना अवैध दारू वाहतुकीची चाहुल लागताच आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पाठलाग करत तब्बल सहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल,तसेच दारु तस्करी करणाऱ्या एका आरोपीस अटक केली आहे.आशिष अभिमन अलोने वय २८ वर्षे,रा.माता वार्ड,देसाईगंज,जि.गडचिरोली असे अटकेतील आरोपीचे नाव आहे; तर देसाईगंज शहराच्या गांधी वार्डातील ३६ वर्षीय आशिष नरेन्द्र दहाट हा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप आगरकर यांना काल रविवारच्या सायंकाळी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वरुन देसाईगंज शहरात एका चारचाकी वाहनाने अवैध दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता पोलीस पथकासह मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली.दरम्यान,मार्गावरून एमएच २० बीसी ८१६१ क्रमांकाच्या सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची चारचाकी रिड्झ वाहन भरधाव वेगाने पळत सुटली. पोलीस पथकाने तात्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला आणि वाहनास अडवले.वाहनाची तपासणी केली असता वाहनात ९० मिली मापाचे २५ बॉक्समध्ये संत्रा ब्रॉंड कंपनीची देशी दारु आढळुन आली.सदर वाहनातून दारू तस्करी करणारा अमन अलोने यास ताब्यात घेतले व सदरची दारू कुठे घेऊन जात आहे; अशी विचारणा केली असता आरोपी अमन अलोने याने आशिष दहाट या इसमाच्या नावाचा उल्लेख केला. पोलिसांनी दहाटचा शोध घेतला असता तो पसार झाला.प्रकरणी पोलिस त्याचा कसुन शोध घेत आहेत. देसाईगंज पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईने दारु तस्करांचे धाबे दणाणले असुन सदरची कारवाई देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप आगरकर,पोलीस हवालदार नितेश कडव,विलास विधाते,सामरपल्लिवार व राऊत यांच्या पथकाने पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

आजपासून श्रावण महिन्यास सुरुवात; श्रावणात असणार चार सोमवार..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.हा संपूर्ण महिना व्रतवैकल्य,धार्मिक विधी, भगवान शंकराची भक्ती,पूजा आणि उपवासासाठी...

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!