Friday, August 28, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजची नमिरा बुरबुरे ऑलिम्पियाडमध्ये राज्यात अव्वल..

देसाईगंजची नमिरा बुरबुरे ऑलिम्पियाडमध्ये राज्यात अव्वल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नुकताच इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड २०२५-२६ च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला.या परीक्षेत देसाईगंज येथील जेजानी स्कूल ऑफ स्कॉलर या शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणारी नमिरा रमेश बुरबुरे हिने सायन्स विषयात राज्यात चौथा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिला १ हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.येत्या जून महिन्यात प्रमाणपत्र व शिष्यवृत्तीचे वितरण होणार आहे.नमिराच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक,मुख्याध्यापिका तसेच वर्गशिक्षिका यांनी नमिराचे अभिनंदन केले आहे.तिच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून पालकवर्गातून नमिरावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!