- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-माझे-माझे म्हणून अनेकांना दुनिया भराची हाव सुटलेली आहे.हितभर जागा असो,नाहीतर शेतीची, घराची हिस्सेवाटणी असो,ते घेतल्याशिवाय अनेकांची भूक भागत नसते.त्यातच पैसा म्हटला तर हात पुढे करणाऱ्यांची संख्या कमी नाही.एवढे करूनही शरीरावर परिधान केलेल्या वस्त्राशिवाय मरणोत्तर कुणीही काहीही घेऊन जात नाही.मृत्यू कुणाला सांगून येत नाही,तर चालता-बोलता ‘राम नाम सत्य’ होत असते.एखादा अपघात वा एखादा आघात हा मृत्यू कवटाळण्यासाठी निमित्त असतो.असाच काहीसा प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे.देवरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ५७ वर्षीय पोलिस हवालदार यांचे दुपारचे जेवण सुरू असतांनाच त्यांना मृत्यूने कवटाळले असल्याची दुःखद घटना २१ ऑक्टोंबर २०२५ रोजी देवरी तालुक्याच्या नारायणनगर,आमगाव येथे घडली.राधेश्याम रामप्रसाद कुंभरे रा.नारायणनगर,आमगाव असे मृत पावलेल्या पोलिस हवालदाराचे नाव असून ते मंगळवारी आपल्या राहत्या घरी दुपारच्या सुमारास जेवण करीत होते.जेवण करत असतांनाच अचानकपणे त्यांच्या छातीत दुखू लागले.छातीत दुखणे सुरू झाल्याने छातीला हात लावत जेवण करतांना जाग्यावरच बेशुद्ध पडले.कुटुंबीयांनी लागलीच राधेश्याम यांना तात्काळ आमगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र,तोपर्यंत उशीर झाला होता.तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती राधेश्याम यांना मृत घोषित केले.प्रकरणी आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार विनोद कुंभरे करीत आहेत.
- Advertisement -

