उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- आपण नेहमीच ऐकत असतो की पैसा असेल तर इज्जत आहे;अन्यथा नाही.सध्याच्या घडीला सगळीकडे हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.मात्र आपण कधी ऐकले नसेल अशी सत्य परिस्थिती आज अनेकांवर ओढवलेली आहे.अशीच खरी परिस्थिती उद्रेक न्युजच्या दिलखुलास गप्पा-गोष्टीच्या माध्यमातून चक्क एका सट्टा-पट्टीच्या एजंटांने आपबीती सांगून सविस्तर खुलासा केला आहे.
मागील काही अनेक महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या चालणारा सट्टा-पट्टीचा व्यवसाय बंद स्वरूपात असल्याचे दिसून येत आहे.पोलीस प्रशासनाने कंबर कसून सट्टा-पट्टी व्यावसायावर बंद पुकारून सळोकीपळो करून सोडले आहे.मात्र एजंटांच्या माध्यमातून स्वतः सट्टा-पट्टीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा फरक पडला नसल्याचे उघड होत आहे.फरक पडला तो केवळ छोट्या-छोट्या एजंटांवर; अनेक एजंट कितीतरी कालावधीपासून या व्यवसायात गुंतून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एका एजंटांने दिलखुलासपणे सांगितले.
ज्यावेळेस सट्टा-पट्टी सुरू होती;त्यावेळेस पैसा यायचा..लोकं इज्जत द्यायचे; मात्र आता काय झाले? कधी कळलेच नाही.सुरुवातीला गोडगोड बोलायचे आणि कडुकडू सोडायचे; मात्र हल्ली कडुकडू बोलतात व गोडगोड सोडतात.इतक्या महिन्यात इज्जतच राहिली नसल्याचे त्याला नंतर कळून आले.साहेब,पैसा येत होता;इज्जत होती.पैसा कमी झाला इज्जतही आपोआप कमी झाली असल्याचे एका एजंटाने म्हटले आहे.
–