- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या पोटच्या मुलाने आईलाच कुन्हाडीने डोक्यात घाव घालून ठार केले.मात्र,आपल्या हातून घडलेल्या या कृत्याची जाणीव झाल्यानंतर त्याने स्वतः घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला-कावराबांध येथे शुक्रवारी १५ नोव्हेंबरला घडली. सुलकन फत्तेलाल बनोठे वय ७५ वर्षे असे मृत आईचे नाव असून लेखराज फत्तेलाल बनोठे वय ५४ वर्षे असे आरोपी व आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
आरोपी लेखराज बनोठे हा व्यवसायाने अभियंता होता; परंतु व्यसनामुळे त्याचा संसार उद्ध्वस्त झाला. लेखराजला चार भावंडे असून,यातील लोकेश या भावाचा आधीच मृत्यू झाला आहे.त्याच्या वडिलाचा सन २००७ मृत्यू झाला.आईला मिळणाऱ्या पेन्शन व शेतीच्या उत्पन्नातून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. सुलकनसोबत त्यांचा धाकटा मुलगा गजेंद्र वय ३४ वर्षे आपल्या कुटुंबासह व आरोपी लेखराज राहत होता. तर लोकेशच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय व मुलगा विजय बनोठे याचे कुटुंबीय गोंदिया येथे राहतात. लेखराजच्या दारूच्या व्यसनामुळे त्याची पत्नी व मुले त्याला सोडून गेली आहेत.
शुक्रवारी लेखराजने आई सुलकन यांना दारूसाठी पैसे मागितले.मात्र,तिने पैसे दिले नाही; यावरून रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिला ठार केले.आपल्या हातून घडलेल्या या कृत्याची जाणीव होताच त्याने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.गजेंद्र बनोठे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक नागदिवे करीत आहेत.
लेखराज बनोठे याने बीई (सिव्हिल इंजिनिअर) शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली,पुणे,हैदराबाद अशा अनेक ठिकाणी नोकरी केली.लेखराजच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे त्याची पत्नी रेणुका बनोठे, मुलगा विवेक आणि मुलगी शुभांगी हे त्याला मागील २० वर्षापूर्वी सोडून गेलीत असून,नागपूर येथे राहतात. तेव्हापासून लेखराज आईसह राहत होता.
- Advertisement -