Sunday, July 12, 2026
Homeदेसाईगंजरामदास मसराम यांच्या प्रचारार्थ आज प्रियंका गांधी देसाईगंज नगरीत..

रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ आज प्रियंका गांधी देसाईगंज नगरीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा आज,रविवार, १७ नोव्हेंबर रोजी विदर्भात प्रचाराचा झंझावात दौरा राहणार आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज(वडसा) येथे आरमोरी विधानसभा मदारसंघाचे उमेदवार रामदास मळूजी मसराम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा देसाईगंज शहराच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजूला लागून असलेल्या आवारात होणार आहे.तर नागपूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेस-महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पश्चिम नागपुरातील अवस्थी नगर चौक येथे आयोजित ‘रोड शो’मध्ये त्या सहभागी होणार आहेत.प्रियंका गांधी यांच्या या दौऱ्यामुळे काँग्रेसजणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प्रियांका गांधी यांचे आज,रविवारी सकाळी ११.२५ वाजता विशेष विमानाने दिल्लीहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी ११.३० वाजता त्या तेथूनच हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे रवाना होतील. देसाईगंज येथे आयोजित जाहीर सभेत त्या मार्गदर्शन करतील.ही सभा आटोपून त्या दुपारी २ वाजता नागपूर विमानतळावर पोहचतील.नागपूर शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी पश्चिम नागपुरातील अवस्थी नगर चौकापासून प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला आहे.या रोड शोमध्ये दुपारी ३.४५ वाजता त्या सहभागी होतील.नंतर सायंकाळी ६ वाजता त्या विशेष विमानाने दिल्लीसाठी रवाना होतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!