Sunday, May 3, 2026
Homeगडचिरोलीदलालांपासून सावधान..! कंत्राटी आरोग्य कर्मचारी पदभरती पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित..

दलालांपासून सावधान..! कंत्राटी आरोग्य कर्मचारी पदभरती पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM), जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदभरती प्रक्रियेबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले की,पदभरती प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसून उमेदवारांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेमार्फत वेळोवेळी कंत्राटी पदांच्या जाहिराती जिल्ह्यातील दैनिक वृत्तपत्रांमध्ये तसेच जिल्हा परिषद गडचिरोलीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.zpgadchiroli.maharashtra.gov.in प्रसिद्ध करण्यात येतात.उमेदवारांच्या पात्र-अपात्र याद्या व भरती प्रक्रियेबाबतच्या सर्व सूचना देखील या संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिल्या जातात.
  • उमेदवारांनी दलालांपासून सावध राहावे👇
अलीकडे काही अज्ञात व्यक्ती समाज माध्यमांतून नोकरीचे आमिष दाखवून उमेदवारांकडून पैशांची मागणी करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.यासंदर्भात जिल्हा परिषदेने तातडीचा इशारा देत स्पष्ट केले की,एनएचएम,जिल्हा परिषद गडचिरोली नोकरीसाठी कोणत्याही व्यक्तीकडून किंवा मध्यस्थांमार्फत पैसे स्वीकारत नाही.अशा प्रकरणात उमेदवारांनी त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली,जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (एनएचएम) यांच्याशी संपर्क साधून तक्रार करावी.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले की, “भरती प्रक्रिया ही पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारेच पार पाडली जाणार असून कोणत्याही प्रकारच्या शंकेला वाव दिला जाणार नाही.उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवर विश्वास ठेवावा आणि अफवांना बळी पडू नये.भरती प्रक्रियेतील प्रामाणिकपणा व पारदर्शकता हीच जिल्हा परिषदेची प्राथमिकता आहे.”
भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिला आहे.उमेदवार व नागरिकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवर विश्वास ठेवून भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!