Saturday, March 15, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तदमदार पावसाची महाराष्ट्राला अजूनहीप्रतिक्षाच....विभागनिहाय पावसाची आकडेवारी…
spot_img

दमदार पावसाची महाराष्ट्राला अजूनहीप्रतिक्षाच….विभागनिहाय पावसाची आकडेवारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- राज्यात उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे प्रकल्प तुडूंब भरतील असे वाटत होते. पण सध्या राज्यातील जलसाठा ६३.४८ टक्क्यांवरच असून मागील वर्षीच्या तुलनेत ही २० टक्के तूट आहे. मध्य महाराष्ट्रात २१, मराठवाड्यात १८,तर विदर्भात ९ टक्के तुटीचा पाऊस झाला.उरलेल्या पावसाळ्यात दमदार पावसाची आस कायम आहे.मात्र मराठवाडा विभागाची स्थिती गंभीर मानली जात आहे.

राज्यात मान्सून आगमनानंतर वाटचाल चांगली झाली.पण अद्यापही धरणातील जलसाठा पुरेसा झालेला नाही.राज्यातील धरणक्षेत्र अजूनही कोरडेच आहे.जुनअखेर ते जुलै मध्यात आणि अखेरीस महाराष्ट्रात धो-धो बरसलेल्या पावसामुळे कुठे दरडी कोसळल्या तरी कुठे महापूर आले.यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र, त्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा परतत नसल्याने राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

राज्यातील मोठे,मध्यम आणि लघु प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती बघितली असता या प्रकल्पातील जलसाठा हा केवळ ६३.४८ टक्क्यांवर असून,मागील वर्षी तो याच तारखेला ८३.३४ टक्के होता.यंदा प्रकल्पात २० टक्के तूट असल्याचे दिसत आहे. त्यामुळे धो-धो बरसलेल्या पावसानंतरही राज्यातील प्रकल्प ‘साठी’च गाठू शकल्याचे चित्र आहे.कोकण विभागात ९ टक्के जादा पाऊस झाल्याचे दिसत असून उर्वरित विभागात तुटीचा पाऊस आहे.

पश्चिम विदर्भातील स्थिती चांगली:

विदर्भातील धरणांच्या जलसाठ्याची स्थिती बघता पश्चिम विदर्भातील स्थिती चांगली आहे.अमरावती विभागात ६९.६१ टक्के जलसाठा आहे.अमरावती विभागातील २६१ प्रकल्पांची एकूण ३ हजार ७७४ दशलक्ष घनमीटर क्षमता असून २ हजार ६२७ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. राज्यात सर्वाधिक जलसाठा असणाऱ्या नागपूर विभागातील ३८३ प्रकल्पांची एकूण ४ हजार ६०६ दलघमी जलसाठा क्षमता आहे. त्यात ३ हजार ५८१ दलघमी जलसाठा आहे.

मराठवाडा विभागाची स्थिती गंभीर:

छत्रपती संभाजीनगर विभागात प्रकल्पामध्ये केवळ ३१.६१ टक्के जलसाठा असल्याची स्थिती असून, मागील वर्षी ती ७४.६४ टक्के एवढी होती.त्यामुळे आता जर पुढील दिवसांत पाऊस न झाल्यास मराठवाड्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे.दरम्यान पावसाळ्याचे सुमारे ३ महिने उलटून गेले आहेत.आता पावसाळ्याचा केवळ एक महिना उरला असून,आता किती टक्के पाऊस पडतो आणि किती टक्के जलसाठा प्रकल्पांमध्ये साठवल्या जातो; यावर पुढील जलसाठ्याचे गणित ठरणार आहे.

प्रकल्पांची सध्यास्थीती;विभाग निहाय टक्केवारी :-

कोकण : ८८. २६

मराठवाडा : ३१.६१

नागपूर : ७७.७५

अमरावती : ६९.६१

नाशिक : ५८.६०

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!