- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-छत्तीसगडच्या चांपा येथून चंद्रपूरला दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकने पेट घेतला असल्याची घटना आज,मंगळवार ११ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील जांभूळखेडा गावापासून १ कीलोमीटर अंतरावरील वळणावर घडली.चालकाने प्रसंगावधान साधत ट्रक घटनास्थळीच थांबविल्याने जीवितहानी टळली.
माहितीनुसार,पंकज जैन ट्रांसपोर्ट कंपनी चंद्रपूर यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक-एमएच ३४ बिजी ३२९६ ने छत्तीसगडच्या चांपा येथून आज चंद्रपूरला दगडी कोळश्याची वाहतूक केली जात होती.वाहतूक सुरू असतांना कोरची ते कुरखेडा महामार्गावरील जांभूळखेडा गावापासून १ कीलोमीटर अंतरावरील वळणावर चालत्या ट्रकने अचानकपणे पेट घेतला.सदरची बाब ट्रक चालक शिवकूमार रा.चंद्रपूर याच्या लक्षात येताच ट्रक थांबवून आपात्कालीन क्रमांकावर संपर्क साधला.त्यानुसार कुरखेडा नगरपंचायत येथील अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले.कोळसा ज्वलनशील पदार्थ असल्याने सहजासहजी आग आटोक्यात येण्याचे नाव धरत नसल्याने देसाईगंजच्या अग्नीशमन दलास पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.त्यातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने ट्रकचे टायर,डिझेल टैंक,वायरिंग व इतर साहित्य जळून खाक झाले होते.अखेर दूपारी १.३० वाजेच्या सुमारास ट्रक मधील दगडी कोळसा खाली पाडत आग आटोक्यात आणण्यात आली.मात्र,यामध्ये ट्रक मालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
- Advertisement -