Thursday, October 8, 2026
Homeनागपूरथरकाप उडवणारी घटना..! तब्बल ४२ नाग सापांची टीम बाहेर पडली असती तर..

थरकाप उडवणारी घटना..! तब्बल ४२ नाग सापांची टीम बाहेर पडली असती तर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र डास,किडे व सरपटणाऱ्या प्राण्यांची जिकडे-तिकडे भटकंती सुरू होत असते.अश्यातच एखादा अति विषारी साप नजरेस पडला,तर त्याला पाहून अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.मात्र,एक नाही,दोन नाही तर तब्बल ४० पेक्षा अधिकचे अति विषारी नाग साप घरात असतील आणि ते बाहेर पडले असते तर.. अशीच काहीशी थरकाप उडवणारी घटना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील नेरला गावात रात्रीच्या अंधारात उघडकीस आली आणि कुटुंबीयांची भंबेरी उडाली.नेरला गावातील राजू ढोमणे यांच्या घरात तब्बल ४० नागांची पिल्ले आणि २ मोठे विषारी नाग साप आढळून आल्याने घरातल्या कोणत्याही काना-कोपऱ्यातून कधीही मृत्यूचा विळखा पडू शकला असता,अशा मृत्यूच्या छायेत ढोमणे कुटूंबीय वावरत होते.रात्रीच्या अंधारात साप दिसून आल्याने राजू ढोमणे यांनी तात्काळ सर्पमित्रांना पाचारण केले.सर्पमित्रांनी घरात शोध घेतला असता सर्वप्रथम एक नाग साप दिसून आला.त्यानंतर,घरातील पोकळ जागेत दबा धरून बसलेले नाग पाहून ढोमणे कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात,तब्बल ४० नागांची पिल्ले आणि दोन मोठे विषारी नाग साप दिसून आले. सर्पमित्रांनी अत्यंत शिताफीने या सर्व नाग आणि पिल्लांना जिवंत पकडल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र, नाग सापांची तब्बल ४२ जणांची टीम बाहेर पडून गावात फिरली असती तर..
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!