उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- उन्हाळ्याची चाहूल हल्ली सुरू झाली आहे.बाहेर ठिकाणी जाणारे वा बाहेर ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांचा उन्हामुळे जीव कासावीस होऊन दुकानांतून मिळणारे थंड पेय पिण्याची इच्छा अनेकांची होत असते.अशा वेळेस थंड पेयाची मागणी वाढत असल्याने अनेक गावात,शहरात थंड पेय उपलब्ध केली जातात.अशातच स्वीट मार्ट,हॉटेल,आईस्क्रीम पार्लर,मॉल, सिनेमा थिएटर,पानठेले,विविध सभागृह आदी ठिकाणी थंड पेय चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट करतांना दिसून येतात.थंड पेय चार्जेसच्या नावाखाली दुकानदार ग्राहकांकडून अतिरिक्त एक ते पाच रुपये वसूल करीत आहेत.परंतु प्रत्यक्षात एमआरपीमध्येच थंड पेय चार्जचा समावेश असतो.परंतु ही बाब अनेक ग्राहकांना माहीत नसल्यामुळे त्यांची दुकानदारांकडून फसवणूक केली जात आहे.त्यामुळे थंड पेयासाठी दुकानदाराने थंड चार्ज लावल्यास त्याची तक्रार करण्याचे आवाहन ग्राहकांसाठी लढा देणाऱ्या संघटनांनी केले आहे.एमआरपीमध्ये थंड पेय चार्जचा समावेश असतो.परंतु अलीकडच्या काळात कोल्डड्रिंक म्हणजे थंड पेय.हे पेय थंड असतांनाच देणे दुकानदारांसाठी बंधनकारक आहे.एमआरपीमध्ये थंड चार्जेसचा समावेश असतो.त्यामुळे ग्राहकांना त्यासाठी वेगळे पैस मोजण्याची गरज नसते.थंड चार्जेसच्या नावाखाली दुकानदार ग्राहकांची लूट करतात.एमआरपीमध्ये थंड चार्जेसचा समावेश असतो.परंतु ग्राहक विरोध करीत नसल्यामुळे दुकानदारांची चांदी होत आहे.त्यामुळे ग्राहकांनी थंड चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त पैसे न देता अशा दुकानदारांची वैध मापन शास्त्र विभागाकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुन अशा प्रवृत्तींना विरोध करावा.
थंड चार्जच्या नावाखाली ग्राहकांनी अतिरिक्त पैसे देऊ नये; दुकानदाराने अतिरिक्त पैसे मागितल्यास ग्राहकांनी वैध मापन शास्त्र विभाग किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.’आपली तक्रार आपला अधिकार’ जोपर्यंत अमलात आणले जाणार नाही; तोपर्यंत असेच चित्र सुरू राहणार आहे.