Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'त्यांना' मिळाला; पण आम्हाला नाही मिळाला नं बोनस..! - अधिकाऱ्यांनी केला खुलासा..

‘त्यांना’ मिळाला; पण आम्हाला नाही मिळाला नं बोनस..! – अधिकाऱ्यांनी केला खुलासा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत राज्यातील विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाच्या बोनसची रक्कम जमा करण्यात आली आहे.ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धानाची विक्री व ऑनलाईन केले अश्यांच्याच खात्यावर बोनसची रक्कम जमा झाली आहे.त्यामुळे प्रत्यक्ष विक्री न करणाऱ्या व केवळ ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढून ‘त्यांना’ मिळाला; पण आम्हाला नाही मिळाला नं बोनस..! मागील कालावधित तर सर्वांनाच मिळाला होता नं बोनस..अशी चर्चा सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे.
शासनाने ई-पीकपेरा झालेल्या सर्व शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा अधिवेशनात केली होती.पण आता सर्वांना बोनस आलेला नाही.सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धान उत्पादकांना प्रोत्साहित राशी म्हणून बोनसची घोषणा केली होती.यापूर्वी प्रतिक्विंटल बोनस याच शासनाने दिला होता.मात्र,त्यात पुन्हा सुधारणा करीत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत सरसकट ई-पीकपेरा नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस मिळणार असे जाहीर केले.त्यामुळे धान उत्पादकांनी  आशा बाळगून खासगीत,खुल्या बाजारात किंवा उत्पन्न घटल्याने धान विकले नाही.त्यामुळे सर्वांना  बोनस मिळण्याची आशा होती.मात्र,ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धानाची विक्री केली,अशा सर्वच शेतकऱ्यांना पहिल्या पन्नास टक्के निधीतून बोनसचे वितरण करण्यात आले आहे.आदिवासी विकास विभागाकडे वेगवेगळ्या तीन याद्या तयार करण्यात आल्याची माहिती आहे.पहिल्या यादीनुसार सुरुवातीला बोनसचे वितरण झाले.यातच वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांची दुसरी यादी,तर दोन्ही याद्यांमध्ये नावांचा समावेश नसलेल्या शेतकऱ्यांची तिसरी यादी.ज्यांची कागदपत्रे बरोबर,त्यांच्या खात्यात बोनसची रक्कम,त्यानुसार बोनसची रक्कम जमा करण्यात आली आहे.अश्यातच ज्यांना बोनस मिळाला नाही,अश्यांच्या बाबतीत जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी खुलासा केला की,सध्या तरी आधारभूत खरेदी केंद्रात धान विकणाऱ्या शेतकऱ्यांनाच बोनसचे वाटप सुरू आहे.पुढे शासन स्तरावरून जसे आदेश येतील,त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल.म्हणजेच,पुढील शासानादेश आल्याशिवाय उर्वरित शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.विशेष म्हणजे,अगोदरच पन्नास टक्के निधी बोनसची रक्कम येण्यासाठी शेतकऱ्यांना सहा महिने वाट पाहावी लागली.यातच आता उर्वरित शेतकऱ्यांना बोनसस मिळणार की नाही? असा प्रश्न अनुत्तरित आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!