Saturday, August 22, 2026
Homeकोंढाळातेंदूपत्त्याच्या बोधभराईसाठी गेलेल्या कोंढाळा येथील इसमाचा दुर्दैवी मृत्यू..

तेंदूपत्त्याच्या बोधभराईसाठी गेलेल्या कोंढाळा येथील इसमाचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-बाहेर राज्यात तेंदूपत्त्याच्या बोधभराईसाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २० मे रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.विशेष म्हणजे,उन्हाचा तडाखा व अतिमद्यप्राशन केल्याने पत्ता फळीवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.प्रकाश किसन वनस्कार वय ४५ वर्षे, रा.कोंढाळा,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे.
सध्या तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू असल्याने कोंढाळा येथील पाच ते सहाजण मजूर म्हणून तेंदूपत्त्याच्या  बोधभराईसाठी मध्य प्रदेशातील कटंगी परिसरात गेले होते.सर्वजण गेल्या दोन दिवसांपासून पोत्यांमध्ये  तेंदूपत्त्याची मुळके भरण्याचे काम करत असतांनाच प्रकाश वनस्कार यांची मनःस्थिती बरोबर नसल्याने ते बेभान झाल्यासारखे वागू लागले.त्यातच,उन्हाची तीव्रता आणि अतिमद्यप्राशनामुळे प्रकृती खालावली.आज सकाळच्या सुमारास पत्ता फळीवर जाताच प्रकाश यांना कसेतरी वाटू लागल्याने ज्याठिकाणी झोपले ते तिथेच झोपून राहिले.बराच वेळ होऊनही उठले नसल्याने सोबतच्या मजुरांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले.घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह तात्काळ कोंढाळा गावाकडे रवाना करण्यात आला आहे.मृतक प्रकाश वनस्कार हे गावात न्हावीचे काम करायचे.त्यांच्या पश्चात दोन मुले व पत्नी असा परिवार आहे.अचानकपणे घडलेल्या घटनेने वनस्कार कुटूंबीय शोकसागरात बुडाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात...

आता पोलीस दलातून निवृत्त होणारे श्वान राहणार पोलीस दलाचाच भाग..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस  दलातून निवृत्त होणाऱ्या श्वानांसाठी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.यापुढे १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर श्वान पोलीस दलाच्या सेवेतून...

घरोघरी जाऊन रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात.. -दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-घरोघरी जाऊन नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिस व पुरवठा शाखेच्या संयुक्त पथकाने दोघांना ताब्यात घेत अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा...

वाढदिवस विशेष..! साधी राहणी,उच्च विचार आणि जनसेवेचा ध्यास- आमदार रामदास मसराम – राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे साधन..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकी पेशातून समाजसेवेच्या व्यापक क्षेत्रात आणि तेथून लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!