उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील कोंढाळा जंगल परिसरात एक अनोखा प्रकार हल्ली निदर्शनास आला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वन विभागाच्या मते ‘प्रुनिंग’ म्हणजेच आपल्या भाषेत ज्याला तेंदुपाने खुट कटाई म्हणतो; अशी तेंदुपाने खुट कटाई कुणी केली याचा थांगपत्ताच लागेनासा झाला आहे.म्हणजे ‘खाकेत कळसा आणि गावाला वडसा’ असा प्रकार दिसून येत आहे.सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचा असून याबाबत वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक यांना तक्रार करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.
येत्या एक ते दीड महिन्यात तेंदुपाने संकलनास सुरुवात होणार असून तेंदुपाने संकलन करण्यापूर्वी मार्च महिन्यात टेंभूर्णीच्या छोटी-छोटी झाडांची खुट कटाई व किंचित मोठ्या झाडांची पाने छटाई म्हणजेच ‘प्रुनिंग’ करण्यात येते.यासाठी सर्वप्रथम वन विभागाच्या वतीने गावातील जी सर्कले निवडली जातात.अशा ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार करून ग्रामसभेत तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी ठरावाची आवश्यकता असते.ग्रामसभेत वन विभागानेच तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया राबवावी; असे ठरल्यास त्यानुसार वन विभाग तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया राबवित असतो.काही ठिकाणी ग्रामपंचायती पेसा कायद्या अंतर्गत स्वतः लिलाव प्रक्रिया राबवून ग्रामकोष समितीची निवड करून संपूर्ण तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया राबवित असतात.तर नॉन पेसा अंतर्गत येणाऱ्या काही ग्रामपंचायती हात झटकून वन विभागाच्या स्वाधीन तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया राबविण्यास तसे ग्रामपंचायत मार्फतीने पत्रव्यवहार केला जातो.याला पर्याय एक व पर्याय दोन असे संबोधले जाते.

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गाव नॉन पेसा मध्ये येत असल्याने कित्तेकवेळा वन विभागाच्या मार्फतीनेच तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया करण्यात यावी; असा ग्रामसभेत ठराव घेऊन पत्रव्यवहार करण्यात येतो.मात्र नवलाची बाब म्हणजे सध्याच्या घडीला कोंढाळा ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारचे ग्रामसभेतील ठराव न देता व कुठल्याही प्रकारचे पत्रव्यवहार न करता; कोंढाळा जंगल परिसरात टेंभूर्णीच्या छोटी-छोटी झाडांची खुट कटाई व किंचित मोठ्या झाडांची पाने छटाई म्हणजेच ‘प्रुनिंग’ करण्यात आली आहे.अशातच अशी ‘प्रुनिंग’ कुणी केली? असा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत देसाईगंज वन परिक्षेत्र कार्यालयाच्या ना वनाधिकाऱ्याला माहीत; ना क्षेत्र सहाय्यकाला; ना वनरक्षकाला याची माहिती नसल्याने जंगल परिसरात काय चालले आहे.कुणीही जंगल परिसरात जावे आणि लिलाव न होता छाटणी वा कटाई करावी काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.
वन विभागाच्या क्षेत्रातील विभागाच्या परवानगी शिवाय कुणीही एक पत्ता सुध्दा तोडूच शकत नाही. मात्र येथे वेगळीच परिस्थीती पहावयास मिळते आहे.तेंदुपत्ताची ना लिलाव प्रक्रिया झाली; ना ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव; कुणालाही लिलाव झालेच नसतांनाही कोंढाळा जंगल परिसरात ‘प्रुनिंग’ करण्यात येणे म्हणजे ‘हे काय चालले’ आहे.जंगल परिसर कुणाच्या अधिपत्याखाली आहे.ज्यांची जबाबदारी आहे.जंगलाच्या रक्षकांनी लक्ष द्यायला पाहिजे होते.मात्र याठिकाणी वेगळीच परिस्थीती निर्माण झाली असल्याने याबाबत वडसा वन विभागाचे उप वनसंरक्षक यांना व वरिष्ठांना तक्रार करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.