- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपुरातील राजीव नगरात काल,बुधवारी दुपारच्या सुमारास एका जोड्याच्या बॉक्समध्ये बॉम्बसदृश वस्तू असल्याच्या अफवेमुळे मोठी धांदल उडाली होती.पोलिस यंत्रणेने तातडीने बॉम्ब स्क्वॉडच्या मदतीने त्या बॉक्सला निर्जन स्थळी नेले.तेथे चाचपणी केली असता बॉम्बच्या नावाने खळबळ उडविणाऱ्या त्या बॉक्समधील सर्किट प्रत्यक्षात एका शालेय विद्यार्थ्याच्या सायन्स प्रोजेक्टचा भाग असल्याची बाब समोर आली.आचारसंहितेच्या कालावधीत बॉम्बची बातमी वाऱ्यासारखी पसरली असताना बॉक्समध्ये काहीच धोकादायक वस्तू न आढळल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.राजीवनगरजवळील पालकर ले-आउटमधील धनीराम नाईक या व्यक्तीला घरात नवीन जोडे ठेवलेल्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट व बॅटरी लागलेली वस्तू दिसली.नाईक यांनी बॉम्बच्या भीतीने तो बॉक्स घराबाहेर काढला.त्यांनी वस्तीतील नागरिकांना याची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांचे पथक, उपायुक्त लोहित मतानी तातडीने तेथे पोहोचले.बॉम्ब स्क्वॉडलादेखील बोलविण्यात आले.नाईक यांचे घर एका गल्लीत असल्याने तो बॉक्स सावधपणे उचलून पोलिसांच्या गाडीत ठेवण्यात आला व तेथून इसासनीतील निर्जनस्थळी नेण्यात आला.पथकाने प्रोटोकॉलनुसार त्या बॉक्सची चाचपणी केली असता त्यात कुठलीही धोकादायक वस्तू नसल्याची बाब स्पष्ट झाली.दरम्यान,पोलिसांनी नायक यांच्या मुलाशी फोनवरून बोलणे केले.त्याने बॉक्समध्ये शालेय प्रोजेक्ट ठेवल्याचे सांगितले. ‘शूजमध्ये दबाव टाकल्यानंतर लाइट कसा लागतो’ हा त्याचा प्रोजेक्ट होता.पालकांना याबाबत कल्पना नसल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला होता.
- Advertisement -

