Tuesday, April 28, 2026
Homeनागपूरतरुणांनो सावधान..! स्वतःच्या शरीराची क्षमता ओळखूनच करा व्यायाम.. - जिमच्या अतिव्यायामामुळे तरुणाच्या...

तरुणांनो सावधान..! स्वतःच्या शरीराची क्षमता ओळखूनच करा व्यायाम.. – जिमच्या अतिव्यायामामुळे तरुणाच्या मेंदूची फाटली नस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सुदृढ आरोग्यासाठी नियमित शारीरिक व्यायाम गरजेचे आहे.पण,कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा जीवघेणा ठरू शकतो.मस्त बॉडी,सिक्स पॅक आणि आकर्षक शरीरयष्टीच्या नादात अनेक तरुण जिम मारून आपल्या जिवाशी खेळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.जिममधील अतिव्यायामामुळे नागपुरातील एका २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूतील रक्तवाहिनीची नस फाटून अर्धांगवायूचा झटका आला.अश्यातच तरुणाच्या आईने वेळीच प्रसंगावधान राखून डॉक्टरांशी संपर्क साधल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तरुणाला मृत्यूच्या दाढेतून परत आणले आहे.
नागपुरातील २३ वर्षीय ओम भोयर दररोज नियमित जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करायचा.अश्यातच शुक्रवार,१० एप्रिल २०२६ रोजी ओम जिममध्ये व्यायाम करून घरी परतला.घरी परतल्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो अचानक बेशुद्ध पडला.सुदैवाने त्याची आई आरती भोयर या घरीच होत्या.त्या स्वतः नर्स असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून हा पॅरालिसीसचा अटॅक असल्याचे ओळखले आणि तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला.प्रख्यात न्युरोव्हॅस्क्युलर स्पेशालिस्ट डॉ.सचिन ढोमणे यांनी तपासणी केली आणि ‘एमआरआय’च्या अहवालात ओमच्या मेंदूतील रक्तवाहिनीची नस फाटून गंभीर रक्तस्राव झाल्याचे आणि रक्ताची गुठळी साचल्याचे स्पष्ट झाले.परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने ओमला तातडीने नागपूरच्या क्रीसेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉ.ढोमणे यांनी ‘इंडोव्हॅस्कूलर सर्जरी’ करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ या आधुनिक तंत्राचा वापर केला.यामध्ये रुग्णाच्या पायात एक छोटेसे छिद्र करून कॅथेटरच्या साहाय्याने डॉक्टर थेट मेंदूच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचले.तेथे अडकलेली रक्ताची गुठळी ‘न्युरो स्टेंट’च्या मदतीने अत्यंत कौशल्याने बाहेर काढली.यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत झाला आणि ओमचा अर्धांगवायू(लकवा)बरा होण्यास सुरुवात झाली.शस्त्रक्रियेवेळी ओमची प्रकृती इतकी खालावली होती की त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले होते.मात्र,१० दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर,काल,मंगळवार २१ एप्रिल रोजी ओम स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटलमधून घरी गेला.डॉ.ढोमणे म्हणाले,अशा रुग्णांसाठी पहिले सहा तास हे ‘गोल्डन अवर’ असतात.जितक्या लवकर ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ होईल,तितक्या लवकर रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता वाढते.ओमच्या बाबतीत वेळेत घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरला.काही रुग्णांमध्ये चोवीस तासांपर्यंत ही शस्त्रक्रिया करता येते.
  • डॉ.अजीज खान,क्रीसेंट हॉस्पिटलचे संचालक👇
जिम नेहमी ‘सर्टिफाइड’ जिम प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच करायला हवे.व्यायाम सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांकडून आपली शारीरिक तपासणी करून घ्यायला हवी.स्वतःच्या शरीराची क्षमता ओळखूनच व्यायाम करायला हवे; अन्यथा अतिउत्साह जिवावर बेतू शकतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लवकरच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती.त्यात ३७ हजार...

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!