Thursday, August 27, 2026
Homeनागपूरतब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.तसेच रोख रकमेसह एकूण १६ लाख ५१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.नागपूर गुन्हे शाखेला शांतीनगरमधील दलाल चौक परिसरातील एका बंदिस्त टीनाच्या शेडमध्ये अंमली  पदार्थांची मोठी खेप आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार ज्ञानेश्वर भोगे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला.यावेळी शेख जावेद वल्द शेख मुन्ना राहीन आणि मोहम्मद हारून रशीद पिंजारी या दोन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून १३ लाख ७४ हजार ९५० रुपये किंमतीचा सुमारे ५५ किलो गांजा जप्त केला. याव्यतिरिक्त,आरोपींच्या अंगझडतीमधील १ लाख ३५ हजार ५७० रुपयांची रोख रक्कम,एक लाख रुपये किंमतीची सुझुकी बर्गमन मोपेड,दोन इलेक्ट्रिक वजनकाटे आणि २६ हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,गेल्या काही महिन्यांपासून नागपूर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.सदरची कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग मानली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!