- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-तीन राज्यांच्या सीमेवर करेगट्टा पहाडावर गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेले देशतील सर्वात मोठे माओवाद विरोधी अभियान सहा महिन्यांसाठी थांबवण्यात आले असतांनाच आता गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे आज,सोमवार १२ मे रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीवरून स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलिस ठाण्याजवळ नक्षलवादी घातपात करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली.त्यानुसार नक्षलविरोधी अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन)एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या २०० जवानांच्या विशेष पथकाने आज,सोमवार १२ मे रोजी सकाळच्या सुमारास जंगल परिसरात शोधमोहीम राबवली.दरम्यान, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार सुरू असता सी-६० च्या जवानांनी जश्यास- तसे प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांना सळो की,पळो करून सोडले.सदरची चकमक जवळपास तीन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तासांहून अधिक काळ सुरू होती. चकमकीनंतर परिसरात राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेत एक स्वयंचलित इन्सास रायफल,एक सिंगल शॉट रायफल,एक मॅगझीन,अनेक जिवंत काडतुसे,डिटोनेटर, एक रेडिओ,वॉकीटॉकी चार्जर,तीन पिट्टु (सामानाची पिशवी),नक्षलविरोधी साहित्य हस्तगत करण्यात आले.झालेल्या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादिशेने पोलिसांकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
- Advertisement -

