उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- अंबाझरी येथील २० एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी गेल्या ६० वर्षापासून आरक्षित असलेली जमीन महाविकास आघाडी सरकार आणि आताची शिंदे,भाजप सरकारने खाजगी कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विकली.खाजगी कंपनीने ताबा मिळताच ह्या आरक्षित जमिनीवरचे नागपूर महानगर पालिकेच्या मालकीचे डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन पूर्णतः उध्वस्त केले असल्याने झालेल्या अन्यायाच्या आणि दडपशाहीच्या विरुद्ध संपूर्ण आंबेडकरी समाज,दलित,मागासवर्गीय, संविधान प्रेमी नागरिक पेटून उठले आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीच्या वतीने जन आंदोलन मागील 3 महिन्यापासून सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयावर स्मारक उध्वस्त करणाऱ्या गुंड कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश जिल्हाधकारी नागपूर यांचे आदेश असतांनाही FIR कां दाखल केली नाही ? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या गुन्हेगारांना पाठीशी कां घालत आहे.या मागणीसाठी व जाब विचाण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
सर्व जागृत नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वीे केला.मोर्चाचे नेतृत्व सामूहिक होते.मुख्य संयोजक किशोर गजभिये माजी सनदी अधिकारी यांच्या नेतृत्वात एम.टी.डी.सी.चे प्रमुख नागपूर विभागाचे कांबळे यांना भेटून निवेदन देण्यात आले व त्यांना कळवण्यात आले की संबंधित विभागाचे सचिव यांचे हमीपत्र पत्र आम्हाला लेखी पाहिजे.दिवसभर आंदोलन केल्यावर सुध्दा शासन प्रशासन अधिकारी ऐकत नसल्याने आंदोलनाने उग्र रूप धारण करून रात्र भर ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेवून आंदोलन एम.टी.डी.सी.कार्यालयातच सुरू राहिले. शासन,प्रशासन,अधिकारी यांना नमावे लागले.लगेच रात्री १० वाजता मुख्य सचिव महाराष्ट्र यांचा फॅक्स विभागीय आयुक्त नागपूर विभाग यांच्या नावे आला आणि सात दिवसात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिल्याने आंदोलनाची सांगता करण्यात आली. आंदोलनात आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
.