उद्रेक न्युज वृत्त :- बिहारमधल्या सितामढी येथील सुरेंद्र सुखी संसाराची स्वप्न रंगवत बोहल्यावर चढला.मात्र कुणाच्याही ध्यानीमनी नसता लग्नसोहळ्यातच त्याची प्राणज्योत मावळली.सितामढी येथील सोनबरसातील इंदरवा गावात लग्नसोहळा सुरू होता.वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली आणि त्यानंतर अचानक नवरदेव सुरेंद्र बेशुद्ध होऊन खाली कोसळला.त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
डीजेमुळे सुरेंद्रचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षदर्शीं माहितीनुसार लग्नसोहळ्यात जोरजोरात डीजे सुरू होता.डीजेचा आवाज कमी करा अशी विनंतीही सुरेंद्रने वारंवार केली.मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि अखेर सुरेंद्रची प्राणज्योत मावळली. डीजे,बँडचा मोठा आवाज आणि प्रखर प्रकाश डिप्रेशन वाढवते.मोठ्या आवाजमुळे अनेकांना घाबरल्यासारखे वाटते.अनेकजण अस्वस्थ होतात. शरीरातील रक्तप्रवाह कमी होऊन हार्ट अटॅक येण्याची शक्यता नाकारता येत नाही.