Saturday, September 26, 2026
Homeकुरखेडाविकास कामांच्या नावावर ग्रामपंचायतीतून मोबदला घेणे भोवले- सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे...

विकास कामांच्या नावावर ग्रामपंचायतीतून मोबदला घेणे भोवले- सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे सदस्यत्व रद्द- कुरखेडा तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीतील प्रकरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा :- तालुक्यातील वडेगाव गट ग्रामपंचायती मध्ये ११ सदस्यीय कार्यकारी मंडळ आहे.येथील सरपंच पदावर जमना जमकातन तर उपसरपंच पदावर भाग्यवान जनबंधू मागील दोन वर्षांपासून कार्यरत आहेत.दरम्यान,येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय कोरेटी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच जमना जमकातन यांचे पती सरपंच पदावर कार्यरत असताना ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरीच्या गाळ उपसा कामावर मजूर म्हणून काम करीत त्याचा मोबदला उचलला.तसेच एप्रिल २०२१ ची मासिक सभा कोरम अभावी तहकूब झाल्याने ती त्याच महिन्यात घेणे बंधनकारक असताना ती घेण्यास कसूर केली,असा आरोप करीत तक्रार दाखल केली.तर उपसरपंच भाग्यवान जनबंधू यांच्या वडिलांच्या नावावर असलेला ट्रॅक्टर जून २०२१ मध्ये ग्रामपंचायतच्या कचरा कुंडीतील कचरा उचल करण्याच्या कामावर लावून त्याचा मोबदला म्हणून १३ हजार रूपये घेण्यात आले.तसेच सार्वजनिक हातपंपावर इलेक्ट्रक मोटर बसवून त्याचा वापर करीत असल्याचा आरोप तक्रारीत केला.तसेच ग्रामपंचायत सदस्य रजनी बंसोड यांच्या पतीच्या नावावर असलेला ट्रॅक्टर जून २०२१ मध्ये ग्रापंच्या कचरा कुंडीतील मलमा सफाईच्या कामावर लावून त्याचा मोबदला म्हणून १४ हजार रुपयांची उचल केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे संजय कोरेटी यांनी केली होती.जिल्हाधिकारी यांच्या दालनात दोन्ही गटाची बाजू एकूण घेत सूनावनी करताना जिल्हाधिकारी यांनी तक्रारदाराची तक्रार ग्राह्य धरत विद्यमान सरपंच जमकातन,उपसरपंच जनबंधू व सदस्य बंसोड यांच्या विरोधात ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मुंबई अधिनियम क्र.३ चे कलम १४ (१) (ग) अन्वये कार्यवाही करून त्यांचे सदस्यत्व रद्द केले.त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!