Friday, July 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; ...अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार १ ऑगस्ट २०२६ पासून सदरचे कार्ड बस प्रवासासाठी अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र,महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रवाशांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे,राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रवासातील विविध सवलतींसाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.यामध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत मिळणारी ५० टक्के सवलत,६५ ते ७५ वयोगटातील नागरिकांना मिळणारी ५० टक्के सूट आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील वृद्धांसाठी असणारा शंभर टक्के मोफत प्रवास यांचा समावेश आहे. याशिवाय,शालेय विद्यार्थ्यांचा ६६.७६ टक्के सवलतीचा मासिक पास तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणारा मोफत पास यांसाठीही एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक राहील.
“एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे.तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये,ही आमची भूमिका आहे.त्यामुळे एनसीएमसी (NCMC)स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले.दिलेल्या मुदतवाढीमुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक,ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटी महामंडळाच्या सवलतींचा गैरवापर थांबवणे आणि संपूर्ण प्रवास प्रणाली अधिक तंत्रज्ञान-आधारित व पारदर्शक करणे हा या एनसीएमसी स्मार्ट कार्डचा मुख्य उद्देश आहे.या कार्डच्या अमलबजावणीनंतर कागदी पास पूर्णपणे बंद होऊन कॅशलेस तिकीट सिस्टीम लागू केली जाईल.येत्या,१ सप्टेंबर २०२६ नंतर ज्या प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड नसेल,त्यांना एसटी प्रवासात दिली जाणारी सवलत मिळणार नसून पूर्ण भाडे देऊनच तिकीट काढावे लागेल.यासाठी पात्र प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट काढणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!