Saturday, September 12, 2026
Homeचंद्रपूरजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शाळेला अचानक भेट; शिक्षक अनुपस्थित.. - मुख्याध्यापकासह...

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शाळेला अचानक भेट; शिक्षक अनुपस्थित.. – मुख्याध्यापकासह एक शिक्षक निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-आजही काही शाळांमध्ये कडक नियम आणि शिस्त अवलंबिले जाते.एखादा विद्यार्थी शाळेच्या वेळेवर उपस्थित राहिला नाही तर गेटच्या बाहेर ठेवून घरचा रस्ता दाखविला जातो.मात्र, विद्यार्थ्यांना शिस्त लावणारेच शिक्षक वरिष्ठांच्या भेटी दरम्यान अनुपस्थित असतील तर..अश्यांनाही शिक्षा व्हायला पाहिजे की नाही? तर अश्यांना अद्दल घडवलिय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी.शाळेच्या वेळेवर उपस्थित न राहिल्याने चक्क मुख्याध्यापकासह एका शिक्षकास चंद्रपूर जिल्ह्याचे सीईओ(मुख्य कार्यकारी अधिकारी) पुलकित सिंग यांनी निलंबित केले आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांचे जिल्ह्यातील शाळांना भेटी देणे सुरू आहे.ते कोणत्या शाळेला भेट देणार याचा काही नेम नाही.त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकवृंद संभ्रमात असून नेहमीची सुरू असलेली दिनचर्या पार पाडण्यात मग्न असतात.अश्याच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बेलघाटा जिल्हा परिषद शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी अचानक भेट दिली.पहिल्याच भेटीत शाळेचे मुख्याध्यापकच शाळेत यायचे होते.मुख्याध्यापक नसल्याने इतर शिक्षकांची झडती घेण्यात आली.यात एक शिक्षक गायब असल्याचे निदर्शनास आले.सदरची बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेत शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शेंडे आणि सहाय्यक शिक्षक गीतेश्वर सोनुले यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली.बुधवार २३ जुलै २०२५ रोजी आदेश काढला असून यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे धाबे दणाणले असून पुढील नंबर कुणाचा?अश्या चर्चांना उधाण आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!