Sunday, April 19, 2026
Homeकुरखेडाजंगली हत्तींनी गडचिरोली जिल्ह्यातील जंगलांचा घेतला ताबा…-कुरखेडा तालुक्यात जंगली हत्तींचा उच्छाद..

जंगली हत्तींनी गडचिरोली जिल्ह्यातील जंगलांचा घेतला ताबा…-कुरखेडा तालुक्यात जंगली हत्तींचा उच्छाद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्हा मुख्यालयाजवळील पोर्ला वनपरिक्षेत्रातून कुरखेडा तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींच्या कळपाने मागील १५ दिवसांपासून तालुक्यात धुमाकूळ घातला आहे.काल,२२ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हत्तींनी चिनेगाव शेतशिवारात प्रवेश करून शेतातील झोपडी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले आहे.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींनी जिल्ह्यातील जंगलांचा जणूकाही ताबाच घेतला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून जंगली हत्ती जिल्ह्यात भ्रमंती  करीत आहेत.

रानटी हत्तींनी कुरखेडा तालुक्याला आपले अधिवास बनवले आहे.महिनाभरापूर्वी जंगली हत्तींचा कळप पुन्हा कुरखेडा तालुक्यात परतला आहे.सध्या येथे जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे.दोन दिवसांपूर्वी हत्तींनी कुरखेडा तालुक्यातील पळसगाव-चांदागड परिसरात धुमाकूळ घातला होता.

हत्तींचा कळप काल,बुधवारी दिनांक- २२ मे रोजी मध्यरात्री कुरखेडा वन परीक्षेत्रातील चिनेगाव शेतशिवारात पोहोचला.येथे जंगली हत्तीच्या कळपाने कमल दादाजी दुमाने रा.चीनेगाव यांच्या शेतातील खोपडी,प्लास्टिक पाइप,बोअरवेलचे नुकसान केले. देविदास धाडूजी जुमनाके रा.चीनेगाव यांचे प्लास्टिक पाइप,चवळी व गवार रोपांचे नुकसान केले.सदर नुकसानाचा पंचनामा व पाहणी करण्यासाठी गोठणगावचे क्षेत्र सहाय्यक डी.डी.उईके,चांदागडचे वनरक्षक एस.एम.दुर्गे मोक्यावर हजर होते.कुरखेडा वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून हत्ती तळ ठोकून आहेत.त्यामुळे गावकरी दहशतीत असून रात्र जागून काढत आहेत.त्याचबरोबर वनविभागाचे पथकही गस्त घालत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!