Wednesday, October 28, 2026
Homeपुणेचौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.परीक्षेच्या पहिल्या सत्रात सकाळी ११:०० ते १२:३० या वेळेत प्रथम भाषा आणि गणित विषयांचे पेपर असतील,तर दुसऱ्या सत्रात दुपारी ०२:०० ते ०३:३० या वेळेत तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा घेतली जाईल.शाळांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार २७ ऑक्टोंबर २०२६ पासून सुरू झाली आहे.
राज्यातील शासकीय,अनुदानित,विनाअनुदानित तसेच कायम विनाअनुदानित शाळांमध्ये चौथी आणि सातवीत शिकणारे महाराष्ट्राचे रहिवासी विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असतील.विद्याथ्यर्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करतांना जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती अचूक नोंदविणे गरजेचे आहे.चुकीची जन्मतारीख नोंदविल्यामुळे पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतात.त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळेच्या जनरल रजिस्टर किंवा दाखल खारिज रजिस्टरवरून माहितीची खातरजमा करूनच अर्ज भरावा.तसेच परीक्षेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.प्रत्येक पेपरसाठी ए,बी,सी आणि डी अशा संचात प्रश्नपत्रिका दिल्या जातील.मराठी,उर्दू,हिंदी,गुजराती, इंग्रजी,तेलुगू आणि कन्नड या सात माध्यमांचा परीक्षेसाठी पर्याय असणार असल्याचे राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!