Tuesday, June 16, 2026
Homeगडचिरोलीचौथा टप्पा:९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील वंचित बालकांचे लसीकरण- जिल्हयात गोवर-रुबेला...

चौथा टप्पा:९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील वंचित बालकांचे लसीकरण- जिल्हयात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली:- जिल्ह्यात गोवर संसर्गजन्य आजाराची साथ नाही; परंतु सद्य:स्थितीत राज्यातील काही भागात गोवरसदृश लक्षणांचे रुग्ण वाढत आहेत.त्या पार्श्वभूमीवर गोवर-रुबेला लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांसाठी मोहिमेचा चौथा टप्पा मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे.येत्या ४ एप्रिल ते १० एप्रिल या तारखेपर्यंत ही मोहिम राबविली जाणार आहे.                 

सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देशित केल्यानुसार गोवर-रुबेला विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर विशेष लसीकरण राबविण्याचे निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार पहिली फेरी १५ ते २५ डिसेंबर २०२२, दुसरी फेरी १५ ते २५ जानेवारी २०२३ व तिसरी फेरी ४ ते १० मार्च या कालावधीत पार पडली.आरोग्य प्रशासनाकडून अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रातील जसे वीटभट्टीतील,जंगलव्याप्त गावे,रस्ता नसलेली गावे, स्थलांतरित मजूर,वीट्टाभट्टीतील घरांना भेट देऊन पर्यवेक्षण करुन ९ ते ५ वर्षांपर्यंतच्या वंचित बालकांचा शोध घेऊन लसीकरण करण्यात आले.मोबाईल पथकाकडून विशेष लसीकरण सत्र आयोजित करुन लसीकरण करण्यात आले होते.तसेच नियमित लसीकरण सत्रात सुध्दा आरोग्य सेविकांनी जिल्हातील बालकांना लसीकरण करुन सुरक्षित केले. तसेच गोवरकरीता नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे.० ते ६ महिन्यांपर्यतच्या बालकांना मातेच्या दुधातून रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त होते.त्यामुळे त्यांना धोका नसतो; परंतु ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करणे गरजेचे आहे.असे डॉ.दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.गडचिरोली यांनी कळविले आहे.तसेच वंचित बालकांसाठी ही चौथी विशेष शोध व लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.वंचित बालकांना लसीकरण करुन सुरक्षित केले जाणार आहे.असे डॉ. स्वप्नील बेले जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जि.प.गडचिरोली यांनी सांगितले आहे.

ही आहेत लक्षणे 👇

ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे,डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत. शरीरात प्रवेश केल्यानंतर ७ ते १० दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरूवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला,सर्दी,डोळे लाल होणे यापैकी एक,दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. त्यानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात.त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन.. – सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नीटच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज, मंगळवार १६ जून २०२६ रोजी...

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!