Tuesday, October 27, 2026
Homeनागपूरचेक पोस्ट नाक्यावर वाहन पास करण्यासाठी एक हजाराची लाच..

चेक पोस्ट नाक्यावर वाहन पास करण्यासाठी एक हजाराची लाच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील कांद्री येथील चेक पोस्ट नाक्यावर वाहन पास करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मोटार वाहन निरीक्षकासह त्याच्या खासगी एजंटला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.दरम्यान,पथकाने चेकपोस्ट कार्यालयाची झडती घेतली असता,तब्बल ४ लाख ३१ हजार २९० रुपयांची रोख रक्कम आढळून आली.याप्रकरणी मोटार वाहन निरीक्षक व एजंट या दोघांना ताब्यात घेत अटक करून रामटेक पोलिसांनी भ्रष्टाचार निवारण अधिनियम १९८८(संशोधित २०१८) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सदरची कारवाई ११ मार्च रोजी करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लाचखोर वाहन निरीक्षक अभिजित मधुकर टाले व सुशील विनोद रामटेककर या दोघांचा समावेश आहे.
यातील तक्रारदार हे ट्रेलर चालक असून त्यांनी कांद्री आरटीओ चेक पोस्टमधून ट्रेलर पास करण्यासाठी १ हजार ते दीड हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली होती.त्यानुसार,तक्रार प्राप्त होताच
एसीबीच्या पथकाने ११ मार्च रोजी पडताळणी केली व सापळा रचला.तक्रारकर्ता ट्रेलर चालक नागपूर ते जबलपूर जाण्यासाठी कांद्री आरटीओ नाक्यावर पोहोचला असता,मोटार वाहन निरीक्षक अभिजित टाले यांच्या अखत्यारित काम करणारा खासगी एजंट सुशील रामटेककर यास १ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.प्रकरणी नाक्यावर अवैध वसुली करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा...

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!