Sunday, August 9, 2026
Homeकोरचीचिमुकलीचे हात-पाय बांधून अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलीस कोठडी.. - कोरची तालुक्यातील घटना..

चिमुकलीचे हात-पाय बांधून अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलीस कोठडी.. – कोरची तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून एका ५१ वर्षाच्या नराधमाने अकरा वर्षीय चिमुकलीचे हात-पाय बांधून अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला.प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कोटगुल पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून काल गुरुवारी न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. धरमसिंग राजाराम कोरेटी वय ५१ वर्षे असे नराधम आरोपीचे नाव आहे.
कोरची तालुक्यातील नराधम आरोपी धरमसिंग याने अकरा वर्षीय चिमुकलीला बुधवारी दुपारच्या सुमारास घरात बोलावले.घरात बोलावून तिचे हात-पाय बांधून  अत्याचार केला व घटनेबाबत कुठे वाच्यता केल्यास
जीवे मारण्याची धमकी दिली.घडलेल्या प्रकाराबाबत चिमुकलीने आईला सांगताच पायाखालची जमीनच सरकली.लागलीच पीडितेच्या आईने कोटगुल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कोटगुल पोलिसांनी नराधमास अटक करून न्यायालयात हजर केले.आरोपीने यापूर्वीही पीडितेसोबत जवळीक साधून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. पोलिसांनी पोलीस कोठडी मागताच आरोपीस एक दिवसाची कोठडी देण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!