- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कोणताही देश असो,त्या देशातील तरुणांनी जर कां मनावर आणले, “अभी नहीं तो कभी नहीं” तर भले-भले तरुणाई पुढे नतमस्तक होत असतात. एकदा कां तरुणाईचे वादळ पेटले,तर अश्यांना विझवणे काहीकाळ तरी कदापिही शक्य नाहीच,असे म्हणावे लागेल.याचे ताजे उदाहरण म्हणजे काल,सोमवारी ८ सप्टेंबर रोजी नेपाळमध्ये झालेले सर्वात मोठे युवा आंदोलन आहे.तरुणांना बेरोजगारी,आर्थिक मंदी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडायचे होते.काल सोमवारी हजारो तरुणांनी नेपाळची राजधानी काठमांडूमधील संसद भवनासमोर निदर्शने केली.ते सरकारकडे सोशल मीडियावरील बंदी उठवण्याची मागणी करत होते.नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर २०२५ रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम,व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि ‘एक्स'(ट्विटर)सह तब्बल २६ सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली होती.या निर्णयाविरोधात काल,सोमवार ८ सप्टेंबर रोजी देशभरातील तरुणाई रस्त्यावर उतरली. हजारो तरुण-तरुणी,ज्यांनी आपल्या आंदोलनाला Gen-Z म्हणजेच ‘जनरेशन झेड आंदोलन’ असे नाव दिले, त्यांनी सार्वजनिक जागा ताब्यात घेतल्या आणि पोलिसांसोबत जोरदार संघर्ष केला.संपूर्ण शहरभर काळ्या धुराचे लोट पसरले होते.आंदोलकांनी पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्या खासगी निवासस्थानांच्या भिंती आणि दरवाजे ओलांडून आत प्रवेश केला,खोल्यांना आग लावली आणि तेथील चित्रांची तोडफोड केली.या आंदोलनाची तीव्रता इतकी होती की, नेपाळ सरकारने सोशल मीडियावरील बंदी उठवूनही आंदोलन थांबले नाही.पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्या सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतल्याचे जाहीर केले होते.तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर दळणवळणमंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी सोशल मीडिया माध्यम पूर्ववत सुरू केले जातील,अशी घोषणा केली. यानंतरही आंदोलक पंतप्रधान ओली यांनी राजीनामा द्यावा,या मागणीवर ठाम होते.
- व्हिडिओ👇
नेपाळची राजधानी काठमांडू येथे सरकारविरोधात कमालीचा हिंसाचार पेटला आहे.पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी आज,मंगळवार ९ सप्टेंबरला राजीनामा दिला असून नेपाळच्या विविध मंत्र्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.अश्यातच उपचाराचे कारण देत पंतप्रधान के.पी.शर्मा ओली विदेशात पळून गेले.सध्या नेपाळमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. के.पी.शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर,नेपाळी सैन्य आता मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानांमध्ये सुरक्षा पुरवली आहे.सैन्य हेलिकॉप्टरद्वारे मंत्र्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहेत.प्रत्यक्षात,देशभरात अनेक ठिकाणी निदर्शकांनी जाळपोळ केली आहे.याबाबत व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.काठमांडूमध्ये निदर्शकांनी नेपाळचे अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली आहे.व्हिडिओमध्ये, काठमांडूच्या एका रस्त्यावर अर्थमंत्री बिष्णू प्रसाद दिसत आहेत. येथे,निदर्शकांनी एका रस्त्यावर अर्थमंत्री बिष्णू प्रसाद यांना घेरले.त्यानंतर,निदर्शक त्यांचा पाठलाग करून एकाने कमरेत लाथ मारली.बिष्णू प्रसाद हे नेपाळचे उपपंतप्रधान आहेत.
- Advertisement -

